नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबई पोलिसांनी देशद्रोही शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली म्हणून उर्वशी चुडावाला विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.१ फेब्रुवारीला शरजीलच्या समर्थनार्थ आणि देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. याचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला करत होत्या.
मुंबई पोलिसांनी उर्वशी सोबत ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.उर्वशी चुडावाला ही टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत मास कम्युनिकेशनची विद्यार्थीनी आहे.याआधी पण ती शरजीलला समर्थन करत होती. तिचे सोशल अकाउंट चेक केल्यावर समजलं कि ती शरजीलच्या पोस्ट शेअर आणि रिट्विट करत होती.
What is this going on in Mumbai?
And why is the Maharashtra Government tolerating this ? pic.twitter.com/1uqnKxs2ns— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 3, 2020
१ फेब्रुवारी ला आझाद मैदानात झालेल्या एका कार्यक्रमात शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली . ह्या घोषणाबाजीमुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर करून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.