नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी सैन्य हनिट्रॅपच्या माध्यमातून भारतीय सैनिकांकडून महत्त्वाची माहिती हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय सैन्याच्या अशा दोन जवानांना अटक करण्यात आली आहे, जे हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला महत्वाची माहिती पुरवत होते. भारतीय जवानांना अडकविण्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे लोक ‘गुरुजी’ आणि ‘बाबाजी’ बनले आहेत.
पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय भारतीय सैनिकांशी फोन, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करून संपर्क वाढवतात आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे युट्यूब, टिक टॉक, बीगो लाइव्ह, व्हॉट्स ऍप , गुगल, आयएमओ, डुओ ऍपवर सैन्याने जवानांना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. या ऍपद्वारे पाकिस्तान सैनिकांची वैयक्तिक माहिती सहजपणे गोळा करू शकतो. याशिवाय भारतीय लष्कराच्या हालचालींबद्दल माहिती मिळवण्यासाठीही रेल्वे क्लार्कला देखील अडकविण्याचा प्रयत्न करत आहे. झाशी, बबीना, सूरतगड, लखनऊ यासारख्या ठिकाणांच्या रेल्वे क्लार्कमार्फत लष्करी अधिकाऱ्यांच्या हालचालीची माहितीही पाकिस्तान घेण्याचा प्रयत्न आहे.
हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला महत्वाची माहिती देणाऱ्या रवी वर्मा आणि विचित्र बेहेरा या दोन सैनिकांना ३ नोव्हेंबरला पोखरण येथून अटक करण्यात आली. या दोघांना पाकिस्तानने ‘सीरथ’ या फेसबुक आयडीद्वारे अडकविले गेले. ऑपरेटिव्ह हनिट्रॅपच्या माध्यमातूनही पाकिस्तानी गुप्तचर सैन्य अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे भारतीय सैन्याने आपल्या सर्व युनिट्स, सैनिक आणि अधिकारी यांना पाकिस्तानच्या या हालचालींबाबत सतर्क राहण्यास स्पष्टपणे सांगितले आहे. कोणासही सैन्य अधिकार्यांची संख्या देऊ नये किंवा कोणत्याही युद्ध खेळाविषयी, ऑर्बेटची योजना किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या घटनेची माहिती सामायिक न करण्याच्या सूचना सैन्याने सैनिकांना दिल्या आहेत. पीआयओ भारतीय सैन्य दलाची माहिती मिळवण्यासाठी लष्करासोबत काम करणारे नागरिक आणि लष्करी कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करत आहे. भारतीय लष्करने फेसबुकवर पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या अश्या १५० हून अधिक facebook id यांची माहिती मिळवली आहे.
Visit : bahujannama.com