नवी दिल्ली :वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये भारतीय मुलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. समोर आलेल्या अहवालानुसार पंख्याला लटकवून तिची हत्या करण्यात आली असून हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतातील हि विद्यार्थिनी वसतिगृहात मृतावस्थेत आढळून आली होती.
निमृता कुमारी असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिला पंख्याला लटकवण्यात आले होते. याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.तसेच पोस्टमॉर्टम अहवालात तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे देखील उघड झाले असून तिच्या कपड्यांवर वीर्याचे डाग देखील आढळून आले होते.
त्याआधी तिच्या भावाने देखील हत्येचा आरोप केला होता. तिचा मृतदेह वसतिगृहात आढळून आला होता. दरम्यान, ती बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. या घटनेमुळे सिंध प्रांतात खळबळ उडाली असून पाकिस्तानाध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Visit : bahujannama.com