नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बर्याच वेळा लोक अल्प प्रमाणात गुंतवणूक करण्यास संकोच करतात. कारण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास अधिक फायदा मिळेल असा विश्वास लोकांना असतो. परंतु एका योजनेत दररोज १६७ रुपये गुंतवूनही तुम्ही लक्षाधीश होऊ शकता. म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करून आपण याचा फायदा घेऊ शकता . जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर…
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे SIP. ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या परतावा मिळतो. म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी सुरू केल्यानंतर, आपण केवळ निर्धारित वेळेपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक नाही. आपण जेव्हा इच्छित असाल तेव्हा ही गुंतवणूक थांबवू शकता. तसेच हे करण्यासाठी कोणतेही दंड नाही. त्यामुळे दीर्घ काळ गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे इतर योजनांपेक्षा हा उत्तम पर्याय असून इथे तुम्हाला करामध्येही मदत होते.
या योजनेअंतर्गत जर आपण दररोज १६७ रुपयांची बचत केली तर ते महिन्यात ५००० रुपये होतील. म्हणजेच SIP अंतर्गत तुम्हाला दरमहा ५००० रुपये या योजनेत गुंतवावे लागतील. जर आपला पोर्टफोलिओ वर्षाला १२ टक्के देत असेल तर आपण २८ वर्षात १.४ कोटी रुपयांहून अधिक पैसे कमवू शकता. त्याचबरोबर ३० वर्षात तुमची गुंतवणूक १. ८ कोटी, तर ३५ वर्षांत ३.२४ कोटी मिळवू शकता.
गुंतवणूकीवर लक्ष ठेवा –
तुमच्या गुंतवणूकीवर तुम्ही लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. दर सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने अपडेट तपासत रहा. आपल्या गुंतवणूकीचे मूल्य वाढत असल्यास चालू ठेवा अन्यथा आपण आपली गुंतवणूक या श्रेणीतील इतरत्र करू शकता.
Visit : bahujannama.com