बहुजननामा ऑनलाईन टीम : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील भरतपूरच्या आग्रा रोडवरील सूर्य सिटीमध्ये एका डॉक्टरच्या पत्नीने तिच्या पतीची कथित प्रेयसी आणि तिच्या ६ वर्षाच्या मुलाला जिवंत जाळले. आरोपी महिलेने या दोघांची हत्या करून तेथून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ सुदीप गुप्ता यांच्या घरात हा प्रकार घडला. आगीचा धूर पाहून लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. या आगीत महिला आणि मुलगा अडकल्याची माहिती मिळताच एसपी हैदर अली यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पण आगीवर नियंत्रण मिळण्यापर्यंत त्या महिलेचा आणि मुलाचा मृत्यू झाला होता.
डॉक्टर सदीप गुप्ता यांच्या घरी आग लावणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांच्या पत्नी डॉ.स्मिता गुप्ता असल्याचे समोर आले. आपल्या पतीचे या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असलेल्या स्मिता यांनी तिला आणि तिच्या मुलाला एका खोलीत बंद ठेवून आग लावली होती. या प्रकरणात आरोपी स्मिता यांच्या आईनेदेखील स्मिता यांची मदत केल्याची माहिती मिळाली आहे.
Visit : bahujannama.com