नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये महामारीचे रूप धारण केलेल्या कोरोना वायरसने आतापर्यंत 170 लोकांचा बळी घेतला आहे. याचे 1700 पेक्षा जास्त प्रकार दाखल झाले आहेत. फ्रान्समध्ये याचा पाचवा प्रकार समोर आला आहे. तर वुहानमधून आलेल्या तीन जपानी नागरिकांना याचा संसर्ग झाला आहे. तिबेटमध्येही आज कोरोना वायरसचा पहिला प्रकार समोर आला आहे.
गूगलने या वायरसमुळे चीनमधील आपली सर्व कार्यालये अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चीन, हाँगकाँग आणि तैवानच्या सर्व कार्यालयांचा समावेश आहे. जागतिक ओराग्य संघटनेने यासंदर्भात आज दुपारी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना वायरसचा प्रकोप अंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याबाबत विचार केला जाणार आहे.
इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले की, वुहानमधून आपल्या नागरिकांना लवकरात लवकर परत आणण्याची योजना तयार केली जात आहे.
तिबेटमध्ये आज कोरोना वायरसचा पहिला प्रकार समोर आला आहे. 34 वर्षीय पीडित व्यक्ती हुबई राज्यातून 24 जानेवारीला आली होती.
जपानच्या आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी सांगितले की, वुहानहून परतलेल्या लोकांपैकी तीन जपानी नागरिकांना कोरोना वायरसचा संसर्ग झाला आहे
फ्रान्समध्ये कोरोना वायरसचा पाचवा प्रकार समोर आला आहे. 80 वर्षीय चीनी नागरिकाला मंगळवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्या मुलीला सुद्धा या वायरसचा संसर्ग झाला आहे.
गूगलने या वायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे चीनमधील आपली सर्व कार्यालये अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चीन, हॉगकाँग आणि तैवानच्या कार्यालयांचा समावेश आहे.
वायरसचे संक्रमण अजूनही सुरूच आहे. यामुळे जगभरातील आरोग्य अधिकारी यास प्रतिबंध करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका आणि चीनसह सात आशियाई देशात कोरानाचे प्रकार समोर आले आहेत.
ल्यूनर न्यू ईयरच्या दरम्यान चीनी लोक जास्त प्रवास करतील. यामुळे चीनने या वायरसचे संक्रमण वाढण्याच्या भितीने प्रवासावर बंदी घातली आहे. याचा परिणाम चीनच्या एक डझन शहरातील सुमारे 56 मिलियनपेक्षा जास्त लोकांवर होणार आहे.
हा वायरस डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात तयार झाला आणि तेव्हापासून जगभरातील विविध शहरांमध्ये तो पसरत आहे. डब्ल्यूएचओच्या अधिकार्यांच्या आकडेवारीनुसार जगभरात याच्या 6000 केसेस समोर आल्या आहेत.
मागील आठवड्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत डब्ल्यूएचओने म्हटले होते की, सध्या चीनमध्ये कोरोना वायरसचा प्रकोप अंतरराष्ट्रीय झाला असून लवकरच अंतरराष्ट्रीय आरोग्य आपत्ती जाहीर होऊ शकते.
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, चीनच्या बाहेरील लोकांमध्ये हा वायरस पसरणे हा चिंतेचा विषय आहे. परंतु, सध्या चीनच्या बाहेर या रूग्णांची संख्या कमी आहे.
Visit : bahujannama.com