नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – छावा संघटना ही सर्व जाती धर्माला सामावून घेणारी संघटना असून, सर्वांच्या न्यायासाठी लढली आहे. मात्र, मराठा आरक्षणाला जाणीवपूर्वक काहींनी विरोध केला आहे. आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा नाशिक जिल्ह्यामधूनच झाला असल्याचे प्रतिपादन छावा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केले.
संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे मराठा मित्र पुरस्कार व शिव जिजाऊ पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. पवननगर येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास छावाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, सुरगाणा संस्थानच्या सोनाली राजे पवार, सचिन मराठे, महेश बडवे, शिवा भागवत, महिला आघाडीच्या संगीता मुरकुटे, निवृत्ती दातीर, पवन मटाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.