Nashik Fire Incidents | शनिवार नाशिकसाठी आगीच्या घटनांचा दिवस, दोन प्रवासी बसने पेट घेतल्यानंतर सिलेंडरच्या ट्रकनं घेतला पेट, रॉकेट सारखे हवेत उडाले सिलेंडर
मनमाड/नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Nashik Fire Incidents | नाशिक जिल्ह्यासाठी आजचा दिवस (शनिवार) आगीच्या घटनांचा दिवस ठरला आहे. आज नाशिक जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स बसला (Private Travels Bus) लागलेल्या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर वणी गडावर (Shree Saptshrungi Gad Vani) निघालेल्या एसटी बसने (ST Bus) पेट घेतला. यानंतर आता मनमाड जवळ पुणे-इंदोर महामार्गावर (Pune-Indore Highway) गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. यानंतर लागलेल्या आगीत सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Exploded) झाला. एकापाठोपाठ एक सिलेंडर (Nashik Fire Incidents) हवेत उडाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. यानंतर ट्रकमध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट होत असल्यामुळे यामार्गावरील वाहतूक दोन किमी अंतरावर थांबवण्यात आली आहे. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रकमध्ये गॅसने भरलेले 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यामुळे सिलेंडरचा स्फोट (Nashik Fire Incidents) झाला. यानंतर एकापाठोपाठ काही सिलेंडर आकाशात उडाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे इथं जाण्यास अडचण येत आहे. अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आज दुपारी नाशिकच्या (Nashik Accident) वणी गडावर जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची (State Transport Corporation) लालपरी बसने अचानक पेट घेतला.
काही कळण्याच्या आतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी भाविक सुखरुप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नांदुरीहुन वणी गडावर ही बस येत होती. गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली.
धावत्या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली.
बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या.
त्यामुळे बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप बचावले आहेत.
स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title: Nashik Fire Incidents | Saturday is a day of fire incidents for Nashik, after two passenger buses caught fire, a cylinder truck caught fire, cylinders shot up in the air like rockets.
हे देखील वाचा :
Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना
Comments are closed.