नाशिक : बहुजन ऑनलाइन – जिल्हयातील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक भयानक घटना घडली आहे. सासर्यानं सुनेला इनोव्हा कारमधून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे तर घडलेली घटना पिडीतेनं सासुला सांगितल्यावर सासुनं तिच्या हाताची नस कापली असा आरोप पिडीतेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सासरा, सासु आणि पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक (51), आकाश आणि सासू प्रमिला यांच्याविरूध्द बलात्कारासह कोटुंबिक हिंसाचार कायदा, मारहाण आणि धमकाविण्याचा गुन्हा गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. इनोव्हामध्ये बलात्कार करणार्या सासर्याला म्हणजेच अशोक याला अटक करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना दि. 1 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2019 दरम्यान घडली आहे. सासर्यानं राहत्या घरी देखील वेळावेळी सुनेवर बलात्कार केला आहे.
एकावेळी तर चक्क निर्जनस्थळी नेऊन सुनेवर इनोव्हा कारमध्ये बलात्कार केला असल्याचं फिर्यादीत नमुद करण्यात आलं आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर मुलासोबत नांदु देणार नाही अशी धमकी देखील सासर्यानं सुनेला दिली. धाडस करून पिडीत सुनेनं हा प्रकार पती आणि सासुला सांगितला. तेव्हपासुन दोघांनी तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. एवढचं नव्हे तर सासुनं तर चक्क सुनेच्या हाताची नस कापली असा आरोप देखील सुनेनं केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चालु असल्याचं गंगापूर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.