नाशिक न्यूज :बहुजननामा ऑनलाइन- Nashik Crime | त्र्यंबकेश्वर (trimbakeshwar) येथे मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर मित्रानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्र एका लॉजवर पीडितेला घेऊन गेला. तेथे शितपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याने अत्याचार केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (panchavati police station) फिर्याद दाखल करण्यात (Nashik Crime) आली असून रोहित आनंद म्हसदे (वय २५ रा पंचवटी फुलेंनगर) याला अटक करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रोहितने आपल्यासोबत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्र्यंबकेश्वर याठिकाणी फिरायला नेलं. त्यानंतर तेथे लॉजमध्ये गेल्यानंतर शितपेयातून पीडितेला गुंगीचे औषध दिल. त्यानंतर आरोपीं तिच्यावर अत्याचार केला. नाशिकमध्ये कडक निर्बंध लागु आहेत.त्र्यंबकेश्वर या पर्यटनस्थळी जाण्यास पोलिसांनी नागरिकांना मज्जाव केला आहे. असं असूनही आरोपीनं पंचवटी येथून पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर घेऊन गेला. पोलिसांची नजर चुकवून आरोपीनं तिला त्र्यंबकेश्वरला नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Web Title : Nashik Crime | friend raped minor girl while going to visit trimbakeshwar nashik crime
Pune Crime | चोरी करताना हटकल्याने चोरट्यांकडून मेट्रोच्या कामगारांना मारहाण, हॅरिस ब्रिजवळील घटना