रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून राणेंना आज मंगळवारी रत्नागिरी (Ratnagiri) पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांना अटक करून संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये (Sangameshwar Police Station) नेण्यात आलंय. दरम्यान, नारायण राणे यांना पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांच्या आरोग्याची डॉक्टरांकडून तपासणी (Check) करण्यात आली होती. यावरून नारायण राणे यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर आलीय. याबाबत राणेंच्या (Union Minister Narayan Rane) आरोग्याची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी (Doctor) माहिती दिलीय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी नारायण राणेंची तपासणी करण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून मीडियांशी सवांद साधला.
यावेळी राणेंच्या आरोग्याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
‘नारायण राणे यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना शूगर आहे आणि त्यांचं ब्लडप्रेशर (Blood pressure) जास्त होतं.
त्यांची शूगर तपासायची होती पण ती तपासता आलेली नाही.
मात्र, त्याचं ब्लडप्रेशर जास्त आढळून आलं आहे.
त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या दरम्यान, नारायण राणेंची (Union Minister Narayan Rane) तपासणी (Check) केल्यानंतर मग पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतलं आहे.
त्यानंतर अटक करून राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत आता पोलीस काय निर्णय घेणार? हे बघणे महत्वाचे आहे.
Web Title : narayan rane arrest rane not well he needs be admitted hospital says doctors
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Earn Money | घरबसल्या कमवा 1 लाख रुपये महिना, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या सोपी पद्धत
Pune News | पुण्यातील R डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी केली दगडफेक