नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – नांदेड इतवारा पोलिस कोठडीत असलेल्या एक आरोपी आज दुपारी ४ ते ५ या वेळेदरम्यान शौचालयाच्या खिडकीतून पळून गेला आहे. हा प्रकार इतवारा पोलिस ठाण्यात घडला. सध्या पोलिसांची वरिष्ठ अधिकारी इतवारा ठाण्यात तळ ठोकून आहेत. अद्याप तरी आरोपी सापडलेला नाही.नांदेडच्या पोलिस ठाण्यामध्ये चोरीच्या आरोपात अटक असलेल्या शेख मुजाहेद शेख हाजी (२२) रा. साईनगर, नांदेड हा काही दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. मिळालेल्या माहितीनुसार आज त्याची पोलिस कोठडी संपणार होतीच. पोलिस आपल्या न्यायालयात जाण्याची तयारी करण्याअगोदरच शेख मुजाहेदने शौचालयाचे जायचे आहे असे सांगून तो शौचालयात गेला आणि शौचालयाच्या खिडकीतून पळून गेला आहे. याबाबतची माहिती प्राप्त होताच इतवारा पोलिसांनी बिनतारी संदेश यंत्रणेवरून सर्व जिल्ह्याला याची माहिती दिली.
एकीकडे आज सायंकाळी ५ वाजता विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या वार्षिक तपासणी संदर्भाने नांदेड जिल्हा पोलिस दलाची कवायत सुरू होती.त्यामुळे बहुसंख्य पोलिस अधिकारी आणि असंख्य पोलिस कर्मचारी त्या कवायतीमध्ये व्यस्त असतानाच हा प्रकार घडला. पोलिसांनी विविध ठिकाणी त्याचा तपास घेतला, पण रात्री १० ते ११ वाजे दरम्यान पर्यंत पळून गेलेल्या शेख मुजाहेदचा काही एक पत्ता लागला नाही. तो पाच फूट उंच ,त्याने अंगात पांढरा रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पॅन्ट घातलेला केली आहे.