मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची मुलाखत बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेअभिनेते अक्षय कुमारने मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर अक्षय कुमार विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले होते .अक्षय कुमारला नमो टीव्हीचे अँकर बनवायला पाहिजे अशी टीका एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. एका प्रचार सभेतील भाषणात ते बोलत होते.
आपण आंबा कशा प्रकारे खाता , असा प्रश्न पंतप्रधानांच्या मुलाखतीत विचारणाऱ्या सिनेअभिनेता अक्षय कुमारची एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी चांगलीच खिल्ली उडवली. आंबा कसा खातात जर माहित नसेल तर हा प्रश्न कशाला विचारला असे म्हणत, ओवैसी यांनी अक्षय कुमार बरोबर पंतप्रधान यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.
आजपर्यंत मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही वृत्तवाहिनीच्या अँकरला अभिनय जमत नाही म्हणून मोदींनी अभिनेत्यालाच अँकर करून टाकले. अक्षय कुमारला आता नमो टीव्हीचा अँकर बनवायला पाहिजे असा टोला ओवैसींनी लागवला.