सांगली : बहुजननामा ऑनलाईन – एका 50 ते 55 वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाट आढळला आहे. शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आलेल्या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री महिलेने आत्महत्या केली असावी किंवा तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
सांगली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे स्वामी समर्थ घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांना एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत त्यांनी तातडीने शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. तो निर्वस्त्र असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान महिलेची साडी तसेच अन्य कपडे घाटावर सापडले आहेत. त्यात एक पर्स सापडली असून त्यात काही नाणीं आणि एक डायरीही सापडली. काही रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्याही आढळल्या असून पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. सांगली शहर पोलीस तपास करत आहे.