Sangli Crime News | पोलिसाकडून लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिसावर अत्याचार, जबरदस्तीने गर्भपात करणाऱ्या पोलिसावर FIR; पोलीस दलात खळबळ

सांगली : बहुजननामा ऑनलाइन – Sangli Crime News | सांगली पोलीस दलात (Sangli Police) कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने (Policeman) महिला पोलिसाला लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) शारीरिक संबंध (Rape) ठेवले. यानंतर महिला पोलीस गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात (Abortion) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस (Sangli Crime News) आली आहे. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सांगली पोलीस बँड पथकात (Sangli Police Band Squad) कार्यरत असणाऱ्या वसीम शब्बीर ऐनापुरे Wasim Shabbir Ainapure (वय-35) आणि त्याचे वडील शब्बीर महबूब ऐनापुरे Shabbir Mehboob Ainapure (दोघे रा. संजयनगर, सांगली) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. दोघांना कोर्टात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. (Sangli Crime News)
वसीमने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाढविली. त्यानंतर वसिम याने पीडितेवर 4 मार्च ते 6 जुलै यादरम्यान सिंधुदुर्ग, अंकली, सांगलीतील वारणाली आणि अष्टविनायकनगर आदी ठिकाणी नेत तिच्या इच्छेविरुद्ध आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यामध्ये पोलीस महिला गर्भवती (Pregnant) राहिली. पीडित महिला गर्भवती असल्याचे समजल्यानंतर वसीम याने तिचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गोळ्या खायला घातल्या. त्यानंतर पीडितेने तक्रार करु नये यासाठी वसीमच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला फोनवरुन धमकी दिल्याचे पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Sangli Crime News | female police constable tortured and had an abortion by luring her into marriage by colleague police sangli
- Pune Crime News | रुमचे भाडे मागितल्याने केली शिवीगाळ, जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने हल्ला करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न
- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आता ऐतिहासिक वारसा स्थळ !
- Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत
Comments are closed.