Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Maharashtra Local Body Election | local self government election elections without obc reservation

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Local Body Election | मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका (Maharashtra Local Body Election) सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये (September-October) होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commissions) राजपत्र जारी केले आहे. हे राजपत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या (Voter Lists) तयार करण्याबाबत आहे. सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत निवडणुका होणार असल्याचे राजपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होण्याची शक्यता आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना (Local Self Government Election) सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा निकाल रखडला आहे. हा निकाल या दरम्यान लागून लगेच निवडणुका लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु हा निकाल लागला नाही तर सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची शक्यता अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह (Mumbai-Pune) राज्यातील 11 पालिकांची मुदत मागील वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. (Maharashtra Local Body Election)

 

मतदार यादीसाठी आयोगाने आदेश जारी केले आहे. आयोगाने मतदार याद्या या 1 जुलै 2023 पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात येतील, असे सूचित केले आहे. याबाबतचा अध्यादेश काढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सप्टेंबर 2023 ते ऑक्टोर 2023 या कालावधीत होणार आहेत, असे आयोगाने म्हटले.

‘या’ महापालिकेच्या निवडणुका होणार –

बृहन्मुंबई (Mumbai)
नवी मुंबई (Navi Mumbai)
पनवेल (Panvel)
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)
पुणे (Pune)
ठाणे (Thane)
उल्हासनगर (Ulhasnagar)
वसई-विरार (Vasai-Virar)
अहमदनगर (Ahmednagar)
अमरावती (Amravati)
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)
भिवंडी-निजामपूर (Bhiwandi-Nizampur)
चंद्रपूर (Chandrapur)
जळगाव (Jalgaon)
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli)
कोल्हापूर (Kolhapur)
मीरा भाईंदर (Meera Bhayander)
नागपूर (Nagpur)
नांदेड-वाघाळा (Nanded-Waghala)
नाशिक (Nashik)
सांगली मिरज आणि कुपवाड शहर (Sangli Miraj and Kupwad city)
सोलापूर (Solapur)

Web Title : Maharashtra Local Body Election | local self government election elections without obc reservation