नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खेळत असताना डास मारण्याचे रीफिल प्यायल्याने एका दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि मन हेलावून टाकणारी घटना रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सक्करदरा पोलिस स्टेशन हद्दीतील आशीर्वाद नगर या ठिकाणी घडली आहे. रिद्धी दिनेश चौधरी असे मृत पावलेल्या दीड वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. (Nagpur Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय घडले नेमके?
रिद्धीचे वडील दिनेश चौधरी यांचे घरीच औषध विक्रीचे दुकान आहे. रविवारी दुपारी दिनेश यांच्या पत्नी कामामध्ये मग्न होत्या. यावेळी रिद्धी ही पलंगावर खेळत होती. यावेळी तिला खेळता खेळता तिला सॉकेटमध्ये लावलेले रीफिल दिसले. यानंतर तिने प्यायची वस्तू समजून रीफिलमधील लिक्विड पिले आणि ती बेशुद्ध झाली. यानंतर काही वेळाने रिद्धीची आई खोलीत आली. तिला रिद्धी बेशुद्धावस्थेत दिसली. यानंतर रिद्धीच्या आईने आरडाओरड केला असता दिनेश धावत खोलीत आले. त्यांनी तातडीने रिद्धीला खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्या ठिकाणी डॉक्टरांनी रिद्धीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. यानंतर रिद्धीच्या नातेवाईकांनी तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र दुर्दैवाने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दीड वर्षीय रिद्धीच्या अश्या दुर्दैवी मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. (Nagpur Crime News)
Web Title :- Nagpur Crime News | mother and son died in accident while going home after birthday party
हे देखील वाचा :