नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Crime News | काही दिवसांपूर्वी नागपूर शहरातील बेसा परिसरात पाण्याच्या टाकीत एका पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. बेसा परिसरात कुटुंबासह राहणारी 5 वर्षीय निष्पाप ज्योती साहू ही गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घरासमोर खेळत होती. (Nagpur Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यादरम्यान अचानक खेळत असताना ती घरासमोरून अचानक बेपत्ता झाली. यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. यानंतर हताश होऊन कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात ती मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर दुसऱ्या दिवशी घराजवळील मोकळ्या जागेत बांधलेल्या टाकीत ज्योतीचा मृतदेह आढळून आला. बेलतरोडी पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. (Nagpur Crime News)
Web Title :- Nagpur Crime News | A 5-year-old girl died after falling into a water tank
हे देखील वाचा :