PM Awas Yojana : 3.50 लाख रुपयांच्या घराची आजपासून सुरू होईल बुकिंग, असा घ्या फायदा

pm-awas

नोएडा : वृत्तसंस्था – पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घर खरेदी करणार्‍यांसाठी केंद्र सरकारकडून होम लोनवर 2.67 लाख रुपयांची सबसिडी दिली जात आहे. केंद्र सरकारने क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीमची शेवटची तारीख वाढवून आता 31 मार्च, 2021 पर्यंत करण्यात आली आहे, जेणेकरून आणखी जास्त लोकांना आपले घराचे स्वप्न पूर्ण करता येईल. अगोदर या योजनेच्या अंतर्गत होम लोन म्हणून 3 ते 6 लाख रुपयांपर्यंत रक्कम बँकेकडून मिळत होती. परंतु आता ती वाढवून 18 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.

पीएम आवास योजनेंतर्गत आता उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. उत्तर प्रदेश आवास विकास परिषदने राज्यातील 19 शहरांमध्ये 3516 घरांचे बुकिंग आजपासून सुरू केले आहे. यामध्ये घर खरेदी करण्यास इच्छुक लोक 15 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत राज्यातील गरीब लोकांना केवळ 3.50 लाख रुपयांत घर मिळेल. ही रक्कम त्यांना 3 वर्षात परत करावी लागेल. पूर्वी युपी हौसिंग डेव्हलपमेंटने पाच वर्षांच्या हप्त्यावर घर देण्याचा प्रस्ताव बनवला होता, परंतु तो नंतर कमी करून तीन वर्ष केला. योजनेत गरीब लोकांना 3.50 लाख रुपयांत मिळणार्‍या घराचा कारपेट एरिया 22.77 वर्गमीटर आणि सुपर एरिया 34.07 वर्गमीटर असेल.

येथे मिळतील घरं
पीएम आवास योजनेत युपीच्या लखनऊमध्ये सर्वात जास्त लोकांना घराचे वाटप केले जाईल. येथे 816 घरांचे बुकिंग होईल. याशिवाय गाजियाबाद 624, मेरठ जागृती विहार 480 आणि गोंडामध्ये 396 घरांचे बुकिंग होईल. राज्याच्या मैनपुरी, फतेहपुर, हरदोई, रायबरेली आणि मेरठमध्ये 96-96 घरांचे रजिस्ट्रेशन होईल. तसेच कानपुर ग्रामीण, कन्नौज, उन्नाव, बहराइच, मऊ, बलरामपुर आणि बाराबंकीमध्ये 48-48 घरांसाठी बुकिंग होईल.

अर्ज करण्याची ही आहे पद्धत

1 सर्वप्रथम झचअध ची अधिकृत वेबसाईट https://pmaymis.gov.in/ वर लॉगइन करा.

2 एलआयजी, एमआयजी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीत असाल तर होम पेजवर सिटीझन असेसमेंटमधील बेनिफिट अंडर आदर 3 कम्पोनन्टवर क्लिक करा.

3 असे करताच चेक आधार/ व्हीआयडी नंबर एक्सिटेंस टायटल वाले पेज ओपन होईल, येथे पहिल्या कॉलममध्ये आधार नंबर नोंदवा. यानंतर दुसर्‍या कॉलममध्ये आधारवरील नाव नोंदवा.

4 असे करताच अ‍ॅप्लीकेशन फॉर्म ओपन होईल. यामध्ये पूर्ण माहिती भरा. मोबाइल नंबर, ई-मेल, सर्व व्यक्तिगत माहिती, इन्कम स्टेटमेंट, बँक खाते इत्यादी टाकून डिक्लरेशन चेकबॉक्सवर टिक करा.

5 सर्व माहिती भरून कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपला फॉर्म सबमिट करा.

6 अ‍ॅप्लीकेशन फॉर्मची फि 100 रुपये आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी 5000 रुपये बँकेत जमा करावे लागतील.