नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वाहतूक कायदा लागू झाल्यानंतर ड्रायव्हींग लायसन्सच्या नियमात केंद्र सरकारने बदल केले आहेत. खासगी, व्यावसायिक आणि ज्वलनशील पदार्थांच्या टँकर चालकांना त्याच नियमांनी परवाना(लायसन्स) जारी केलं जाणार आहे. सारथी अॅपमध्ये नुकतेच या नियमासाठी बदल झाले आहेत. जुन्या वाहतूक कायद्यानुसार, कोणी 18 व्या वर्षी परवाना घेत होतं, तर कोणी वयाच्या 20 किंवा 50 व्या वर्षी परवाना घेत होतं.
यानंतर हा परवाना रिन्यू करावा लागत होता. आता परवान्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, जर 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने परवाना बनवला तर 40 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याला परवाना जारी केला जाईल. यांतर चालकाला परवाना रिन्यू करावा लागेल. 30 वर्षांपेक्षा जास्त आणि 55 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला 10 वर्षांसाठी परवाना दिला जारी केला जाईल. यानंतर त्याचे नुतनीकरण करावे लागेल. 50 पेक्षा जास्त आणि 55 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला 60 वर्षांपर्यंत आणि 55 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना पाच पाच वर्षांसाठी परवाना दिला जाईल. यानंतर त्याचे नुतनीकरण करावे लागेल.
व्यावसायिक परवान्याचा कालावधी आता 5 वर्ष
व्यावसायिक परवान्याचा कालावधी आधी 3 वर्ष होता. आता हा कालावधी 5 वर्ष करण्यात आला आहे. यानंतर चालकाला पाच वर्षांनी परवान्याचे नुतनीकरण करावे लागेल.
ज्वलनशील पदार्थांच्या टँकरचे चालक 3 वर्षांत करतील नुतनीकरण
परिवहन विभाग ज्वलनशील पदार्थांच्या चालकांसाठी आधी एक वर्ष परवाना देत होतं. आता हा कालावधी वाढून तीन वर्ष करण्यात आला आहे. असे परवाना धारक आता 3 वर्षांनी परवान्याचे नुतनीकरण करतील. बुधवारपासून या नवीन नियमांतर्गत परवाना दिला जात आहे. या नवीन तरतुदींनंतर आथा सारथी अॅपमध्येही हे बदल करण्यात आले आहेत.
Visit : bahujannama.com