नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाने काही दिवसांपूर्वी ग्राहकांच्या महाग प्लॅन्सच्या तक्रारीनंतर एक स्वस्त पारंपरिक आणि प्योर प्रोटेक्शन टर्म इंश्योरंस प्लॅन जीवन अमर लाँच केला हातो. LIC जीवन अमर प्लॅनअंतर्गत दोन डेथ बेनिफिट्स ऑप्शन्स, जसं की, लेवल सम अॅश्योर्ड आणि इन्क्रिजिंग सम अॅश्योर्डमध्ये कोणतीही एक सुविधा तुम्ही निवडू शकता. हा प्लॅन ऑफलाईन विक्रीसाठीही उपलब्ध आहे. जीवन अमर हा प्लॅन स्वस्त तर आहेच परंतु याची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
10 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत पॉलिसी टर्म
LIC चा जीवन अमर प्लॅन 18-64 वयोगटातील लोकांसाठी घेतला जाऊ शकतो. या पॉलिसीअंतर्गत मॅक्सिमम एज मॅच्युरिटी 80 वर्ष आहे. जीवन अमरमध्ये पॉलिसी टर्म 10 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत राहिल. जे लोक धुम्रपान करतात आणि जे करत नाहीत त्यांचा हप्ताही वेगळा असणार आहे. पुरुषांचा हप्ता महिलांच्या हप्त्यापेक्षा वेगळा असेल. धुम्रपान करणाऱ्याला धुम्रपान न करणाऱ्याच्या तुलनेत जास्त हप्ता भरावा लागेल. रेग्युलर प्रीमियम ऑप्शनमध्ये कोणतीही सरेंडर व्हॅल्यू मिळणार नाही. हा पर्याय सिंगल प्रीमियममध्ये उपलब्ध असेल. लिमिटेड प्रीमियम ऑप्शनमध्ये काही नियम आणि अटी असतील.
हप्ते भरण्यासाठी मिळणार हे पर्याय
एलआयसीच्या जीवन अमर प्लॅनमध्ये हप्ता भरण्यासाठी तीन पर्याय असतील. सिंगल प्रीमियम, रेग्युलर प्रीमियम आणि लिमिटेड प्रीमियम. लिमिटेड प्रीमियममध्ये दोन पर्याय प्रीमियम पेईंग टर्म, यात पॉलिसी टर्म 5 वर्षांपेक्षा कमी आणि दुसरा पॉलिसी टर्म 10 वर्षांपेक्षा कमी आहे. हप्ता भरण्यासाठी कमाल वय 70 वर्ष असेल. रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम पर्यायात किमान हप्ता 3000 रुपये असेल. सिंगल प्रीमियम मध्ये किमान हप्ता 30000 रुपये असेल.