नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये अनेक मुस्लिम महिलांनी डीएम कार्यालय गाठले आणि पंतप्रधान मोदी यांचे मंदिर बांधण्यासाठी निवेदन दिले. मुस्लिम महिला म्हणतात की मोदी जी मुस्लिम महिलांसाठी बरेच काही करत आहेत, म्हणूनच आम्ही त्यांचे मंदिर बनवित आहोत. कृष्णापुरी परिसरात मंदिर बांधतो आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंदिरासंदर्भात आम्ही डीएम साहिबा यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, अशी माहिती मुस्लिम महिला रुबी गझनी यांनी दिली. आम्ही कृष्णापुरीमध्ये पंतप्रधान मोदींचे मंदिर बनवित आहोत. मोदी जी आपल्यासाठी इतका चांगले काम करत आहे आणि मोदींना जगात पुरस्कार मिळत आहेत. त्यांना काहीतरी चांगले काम केले असेल म्हणून त्यांना पुरस्कार मिळत आहेत, म्हणून आम्ही त्यांचे मंदिर बनवित आहोत.
आम्ही सर्व महिला पैसे जमा करून सर्वजण नरेंद्र मोदींचे मंदिर बांधतो आहोत. आम्ही हा संदेश देत आहोत की मुस्लिम महिला मोदी जी यांच्या बरोबर आहेत. त्यांनी चांगले काम केले आहेत. ज्या लोकांकडे घर नव्हते त्यांनी त्यांना घर दिले आहे. त्यांनी घरे बांधली आहेत. ज्यांच्याकडे सिलिंडर नव्हते त्यांना सिलिंडर दिले आहेत आणि अशा अनेक योजना आहेत ज्या मोदींनी मुस्लिम समाजासाठी केल्या आहेत.
Visit : bahujannama.com