कर्नाटक : वृत्तसंस्था – कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा आणि इतरांविरूद्ध छापे टाकून आयकर विभागाने सुमारे ४.२५ कोटी रुपयांची रोकड वसूल केली आहे. अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सुरू झालेली ही तपासणी अजूनही जवळपास 30 ठिकाणी सुरू आहेत. या छापेअंतर्गत आयकर विभागाचे ३०० हून अधिक अधिकारी कर्नाटकातील दोन प्रमुख कॉंग्रेस नेत्यांशी निगडित परिसरात दाखल झाले.
या नेत्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर आणि माजी खासदार आर.एल. जलप्पा यांचे पुत्र जे राजेंद्र यांचा समावेश आहे. नीट परीक्षांशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कर चुकवल्याच्या प्रकरणात हे छापे टाकले जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर यांच्याशी संबंधित कार्यालये, घरे आणि संस्थांवर छापे घालण्याव्यतिरिक्त आयकर अधिकाऱ्यांनी त्याचा मेहुणा शिवप्रसाद आणि वैयक्तिक सहाय्यक रमेश यांच्या घराचीही झडती घेतली.
परमेश्वर यांचे कुटुंबीय सिद्धार्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स चालवित आहेत, तर राजेंद्र डोडाबल्लापुरा आणि कोलारमध्ये आर.एल.जलप्पा इन्स्टिटयूट आणि टेक्नॉलॉजी चालवते. अधिकाऱ्यांचा पुढील तपास सुरु आहे.
Visit : bahujannama.com