वाराणसी वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील एका भाजप आमदाराने पुन्हा एकदा मुस्लीमांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लीमांमध्ये ५० बायका केल्या जातात. त्यांना १०५० मुले होतात. ही परंपरा नसून प्राण्यांची वृत्ती आहे. असं विधान बैरिया येथील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे.
#WATCH Surendra Singh, BJP MLA from Ballia: In Muslim religion, you know that people keep 50 wives and give birth to 1050 children. This is not a tradition but an animalistic tendency. (14.07.2019) pic.twitter.com/i3AJa9ZSxw
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 15, 2019
#WATCH BJP MLA Surendra Narayan Singh: Mayawati ji khud roz facial karwati hain, vo kya humare neta ko kya shaukeen kahengi. Baal paka hua hai aur rangeen karwake ke aaj bhi apne aap ko Mayawati ji jawan saabit karti hain, 60 varsh umar ho gayi lekin sab baal kaale hain pic.twitter.com/SGRK4gZpEI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 19, 2019
सुरेंद्र सिंह हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी यापुर्वी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यांनी यापुर्वी लोकसभा निवडणूकीदरम्यान पातळी सोडून बसपा प्रमुख मायावती यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी मायावती या रोज फेशियल करतात. तर आता त्या ६० वर्षांच्या असूनही अजून तरुण असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न त्या करत असतात असं विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती.
Ye vipakshi rashtravirodhi hain. Inka aaka, kisi ka Islam mein baithta hai, kisi ka Italy mein basta hai…2019 ka chunav, Islam banam Bhagwaan hone jaa raha hai. Isliye Bharat ke logon, nirnay kar lena, ki Islam jeetega ya bhagwaan jitega: BJP Bairia MLA Surendra Singh in Ballia pic.twitter.com/Dh63cpMQD6
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 12, 2018
तसेच विरोधी पक्षांवरही त्यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. विरोधी पक्ष हे राष्ट्रविरोधी आहेत. त्यातील काहींचा आका म्हणजे प्रमुख हा मुस्लीमांमध्ये तर काहींचा इटलीमध्ये बसतो. २०१९ ची निवडणूक ही इस्लाम विरुद्ध भगवान अशी आहे. त्यामुळे भारताच्या लोकांनी निर्णय़ ध्यावा की इस्लाम जिंकेल की भगवान असंह विधान त्यांनी केलं होतं.
UP BJP MLA Surendra Singh , on the #UnnaoHorror – You tell me ,a mother of three children ,will someone rape her ? We are married – a mother of 3-4 children ,someone rapes her , you get someone hit by a lathi and you rape his minor daughter , it's psychologically not possible pic.twitter.com/SUbgwU325P
— Alok Pandey (@alok_pandey) April 11, 2018
त्यासोबतच कुलदीप सेंगर या आमदारावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर त्यांनी तीन मुलांच्या आईसोबत कुणी अश्लील कृत्य करेल का ? आरोप करणाऱ्या महिलेची नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्यांनी केली होती.
भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पक्ष अडचणीत येत आहे. त्यात सुरेंद्र सिंह यांच्या या विधानांच्या मालिकेनंतर पक्ष त्यांच्यावर काही कारवाई करेल का ? याची चर्चा सुरु आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीत भाजप नेत्यांना माध्यमांपासून आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही आमदारांकड़ून अशा प्रकारची विधानं केली जात आहेत. त्यामुले नवा वाद निर्माण होणाची शक्यता आहे.