मुंबई ( बहुजननामा ऑनलाइन) – दृष्टिहीनांना नोटा ओळखता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. अनेक वेळा त्यांची फसवणुक देखील होते. यावर उपाय म्हणून केवळ दृष्टिहीनांना नोटा ओळखता याव्यात, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) मोबाईल अॅप विकसीत करण्यात आले आहे.
बाजरात आजही मोठ्या प्रमाणात रोख चलणाचा वापर केला जातो. त्यामुळे व्यवहार करताना दृष्टिहीनांना नोटा ओळखणे अवघड जाते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन हे अॅप विकसित करण्यात येणार आहे, असे आरबीआयकडून सांगण्यात आली आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असणारी 100 रुपयांची नोट इंटॅग्लिओ प्रणणालीवर छावण्यात येते. या नोटेवर असलेल्या विशिष्ट खुणेमुळे ती दृष्टिहीनांना ओळखता येते. मात्र चलनात सध्या १०, २०, ५०, २००, ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटांवर ही प्रणाली नसल्याचे दृष्टिहीनांनची अडचण होते. मात्र नव्याने विकसीत करण्यात येत असलेल्या मोबाईल अॅपमुळे या समस्येवर मात करता येणार आहे.
या मोबाईल अॅपमध्ये नव्या व जुन्या नोटा दोन्ही प्रकारच्या नोटा ओळखता येतील. या अॅपच्या माध्यमातून मोबाइल कॅमेरासमोर संबंधित नोट धरून तिचा फोटो काढावा लागेल. ही नोट योग्य असल्यास तसेच, फोटो योग्य प्रकारे काढला गेल्यास अॅपच्या वापरकर्त्याला ऑडिओ सूचना दिली जाईल व त्यात संबंधित नोट किती रुपयांची आहे हे सांगितले जाईल.
आरबीआयकडून सांगण्यात आले आहे की, दृष्टिहीनांना नोटा ओळखता येत नसल्याने आम्ही व्यथित आहोत. त्यामुळे दृष्टिहीनांना नोटा ओळखणे अधिक सोपे जावे यासाठी हे नवे अॅप विकसित केली जात आहे. यातून दृष्टिहीनांनची नोटा ओळखता येणाची अडचण दुर होईल.