नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात मॉब लिंचिंगचे प्रकार सुरु आहेत. औरंगाबाद पर्यंत जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यासारख्या निंदास्पद घटना घडत आहेत. कुठल्याही अधर्मीय आणि समाजकंटकांकडून अशा घटना घडत असताना नांदेड जिल्ह्यातील अनेक मुस्लिम तरुणांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या नेत्यासाठी चक्क महादेवाला आभिषेक केला. त्यामुळे याची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.
कंधार तालुक्यातील बारुळ येथील बबलू शेख बारुळकर यांनी आयोजनातून भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता बारुळ येथील जागृत देवस्थान महादेव मंदिर येथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना उदंड आयुष्य लाभावे.यासाठी महापूजा करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळ येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.
खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कंधार-लोहा मतदार संघात २५०० झाडे लावण्याचा शेख यांनी संकल्प करत वृक्षारोपण बारुळ येथून सुरुवात करण्यात आली. बारुळ येथील आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले अश्या अनेक उपक्रमांनी बारुळ येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आयोजक बबलू शेख बारुळकर सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मुनेश्वर, डॉ.सूर्यवंशी, रावसाहेब नाईक (से.स.सो.चे अरमन बारुळ), हैदर पठाण, सुलतान शेख, हुलाजी वखरडे, सामाजिक वनीकरणचे नारायण टोकलवड, शबीर शेख, शाहरूख पठाण, ए. एल.नरवाडे, डी. के.बोधगिरे, ए. एम.शिखरे, बी. बी. पांडागळे, अलवादीन शेख, सलीम शेख सह आदी उपस्थित होते.