बहुजननामा ऑनलाईन – इंग्लंडमधील शाळेत शुक्रवारी सुरू झालेल्या संगीताच्या अभ्यासक्रमात भारतीय शास्त्रीय संगीत, बॉलिवूड हिट, भांगडा बीट समाविष्ट आहेत. शिक्षण विभागानं (डीएफई) म्हटलं की, जास्तीत जास्त युवकांना संस्कृतींच्या माध्यमातून संगीताबद्दल शिकण्याची आणि ऐकण्याची संधी देण्याचा या योजनेचा हेतू आहे.
किशोरी अमोनकर यांचं सहेली रे, अनुष्का शंकर यांचं इंडियन समर, ए आर रहमान यांचं जय हो, बॉलिवूड बॉक्स ऑफिस हिट मुन्नी बदनाम शाळेसाठीच्या डिएफई अभ्यासक्रम मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट भारतीय संगीत संदर्भांपैकी एक आहे.
मार्गदर्शक तत्वात सांगितलं गेलं आहे की, हे स्विकार करणं महत्त्वाचं आहे की, आधुनिक ब्रिटीश ओळख समृद्ध वैविध्यपूर्ण आहे. किशोरी अमोनकर 20 व्या शतकातील भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रमुख गायिकांपैकी एक होत्या.
यात 2010 साली आलेल्या दंबग सिनेमातील मुन्नी बदनाम चा देखील संदर्भ देण्यात आला आहे. यात म्हटलं आहे की, गीत, नृत्य आणि रंगीबेरंगी दृश्यात बॉलिवूड सिनेमांच्या अनेक खास बाबींचा समावेश आहे. डीएफईनं असंही सांगितलं की, याचा मॉडेल संगीत अभ्यासक्रम 15 संगीत शिक्षण तज्ज्ञ – शिक्षक आणि संगीतकारांच्या एका पॅनलनं विकसित केला आहे.