मुंबई बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक अप्रकाशित पैलूंचे दर्शन घडवणारे आणि आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते आणि लेखक सुहास सोनवणे यांचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झाले.(आज ६ जुलै ) सकाळी दादर येथील त्यांच्या राहत्या घरातून सकाळी १० वाजता अंत्ययात्रा निघणार असून शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
लेखक सुहास सोनवणे यांचा आंबेडकर चळवळी अभ्यासाचा विषय होता. मुंबई शहराची त्यांना खडानखडा माहिती होती. ते गेली तीस वर्ष वृत्तपत्रे, मासिकांमध्ये लेखन करत होते तसेच मुंबईचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख होती .त्यांचे ‘मुंबई कालची’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तर लवकरच ‘पुसलेली मुंबई’ पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर होते.
त्यांनी चळवळीविषयी लिखाण करत अनेक पुस्तके लिहली आहेत .त्याशिवाय त्यांनी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे दीर्घ काळ स्वीय सचिव म्हणूम काम केले आहे. केरळचे राज्यपाल रा. सु. गवई यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहिले.
त्यांची ग्रंथसंपदा :
१)’सत्याग्रही आंबेडकर’
२)’शब्द फुलांची संजीवनी’
३)’ग्रंथकार भीमराव
४)’बहु आयामी आंबेडकर’
५)डॉ. आंबेडकर आणि समकालीन’