पिंपरी बहुजननामा ऑनलाईन – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची यंदाची १०० वी जयंती आहे. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरात प्रबोधन, प्रसार, प्रचारार्थ असे विविध उपक्रम राबविण्यासाठी ५० लाख रुपये जाहीर करण्याची मागणी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.याबाबत महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हंटले आहे कि, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंची १०० वी जयंती आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूल्यांचा प्रबोधन, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी महापालिकेने ५० लाख रुपयांचा निधी उपलबध करुन देण्यात यावा.
अण्णाभाऊ साठे यांनी अनुभवातून समृद्ध शिक्षण घेतले. त्यांनी अर्धवट शिक्षण घेऊन देखील इतर सुशिक्षित साहित्यिकांच्या तोडीस तोड साहित्य निर्माण केले.अण्णाभाऊ एक कृतिशील समाजसुधारक होते. जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या विचारांचा शहरात प्रसार करण्यासाठी महापालिकेने ५० लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात यावा , अशी मागणी नगरसेविका गोरखे यांनी निवेदनातून केला आहे.