मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai-Pune Expressway |मुंबई व उपनगरात सुरु असलेल्या धुंवाधार पावसा(Heavy rain)मुळे मुंबई -पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वरही पाणीच पाणी झाले असून वाहनांना त्यातून वाट काढावी लागत आहे. पनवेल (panvel), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan) परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील ओढेनाले तुडुंब भरुन वाहू लागले. ते पाणी रस्त्यावर आले आहे. पनवेल परिसरातून जाणार्या मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai-Pune Expressway) वरही पाणी साचले आहे. अगदी अवजड वाहनांची चाके अर्ध्याहून अधिक बुडतील इतके पाणी महामार्गावर साचले आहे. त्यामुळे वाहतूक संथगतीने पुढे सरकत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पेणमध्ये पूर परिस्थिती
पेण हे सर्वांग सुंदर गणेश मूर्तीं(Ganesha idol)साठी प्रसिद्ध आहे. तेथे अनेक कारखान्यांमध्ये सध्या गणेश मूर्ती तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे. मात्र, काल झालेल्या पावसाने या संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले आहे. अनेक गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरले असून त्यात गणेश मूर्ती पाण्यात भिजल्या आहेत. या पावसामुळे पातळगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. तिने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीच्या लगत असलेल्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. श्रीवर्धन -दिघी रस्ता(Shrivardhan-Dighi road) खचला असून यावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. पावसामुळे कोकणासह मुंबई व परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Web Title : Mumbai-Pune Expressway | Water only on Mumbai Pune Expressway; Ganesh idol in water?
Pune Crime | येवलेवाडीतील निर्मल स्क्वेअर या बांधकाम साईटवर 5 व्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू
Pune Crime | पुण्याच्या चंदननगरमध्ये वडिलांसोबत वाद घालणार्याला बेदम मारहाण
Gold Price Today | स्वस्त झाले सोने, चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे भाव