पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कोंढवा पोलिस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील येवलेवाडीतील निर्मल स्क्वेअर (nirmal square in yewalewadi) या बांधकाम साइटवर काम करताना पाचव्या मजल्यावरून कोसळून मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन ठेकेदारावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
नीलकमल गुरुगोपाल चक्रवर्ती (वय 43, रा. वाघजईनगर मूळ. पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मनीलाल गोविंद राठोड आणि अजय सत्यनाथ मिस्त्री यांच्यावर कोंढवा पोलीस (Kondhwa Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आनंदा घोष (वय 29) यांनी तक्रार दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीतील निर्मल स्क्वेअर (nirman square in yewalewadi) या बांधकाम साइटवर फिर्यादी यांचे सासरे नीलकमल चक्रवर्ती सेंट्रींगची काम करत होते. कामाचा ठेका राठोड आणि मिस्त्री यांनी घेतला आहे.
राठोड मुख्य ठेकेदार (contractor) असून, मिस्त्री हे सब ठेकेदार आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी निलकमल पाचव्या मजल्यावर काम करत होते.
काम करत असताना अचानक पाचव्या मजल्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत घटनेची नोंद करण्यात आली होती.
त्याबाबत चौकशी करण्यात आली.
त्यानुसार कामगारांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना केल्या नव्हत्या, असे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास कोंढवा पोलीस (Kondhwa Police) करत आहेत.
Web Title : Pune Crime | One died after falling from the 5th floor of Nirmal Square in Yeolawadi.
Gold Price Today | स्वस्त झाले सोने, चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे भाव
Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 17 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार, तरूणावर उत्तमनगर पोलिसांमध्ये FIR