मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Mumbai Kandivali Crime | मुंबईतील कांदिवली परिसरातील एक धक्कादायक घटना (Mumbai Kandivali Crime) समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार लोकांचे मृतदेह (Deadbody) रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांना कळवले असून सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या खळबळजनक घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी की, किरण दळवी (Kiran Dalvi), मुस्कान दळवी (Muskan Dalvi), भूमी दळवी (Bhumi Dalvi), शिवदयाळ सेन (Shivdayal Sen) या चौघांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये तिघींची हत्या (Murder In Mumbai Kandivali) करण्यात आली होती तर एक गळफास लावलेल्या स्थितीत आढळला आहे. चालक म्हणून कामाला असलेल्या शिवदयाळ यानेच मालकीण आणि तिच्या दोन मुलींची हत्या करून आत्महत्या (Suicide In Kandivali) केल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचं म्हटलं जातेय.
चालक शिवदयाळ याचे डॉक्टर महिलेच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते.
त्यामुळे त्याने तिघांची हत्या करत आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
आई आणि मोठ्या बहिणीचा प्रेमाला विरोध होता. म्हणूनच प्रथम आई आणि बहिणीची हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तसेच, घटनास्थळी 5 सुसाईड नोट्स सापडल्या असून या घटनेचा अधिक तपास पोलिस (Kandivali Police) करत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Mumbai Kandivali Crime | 3 women killed in love affair in kandivali then commit suicide mumbai crime news
हे देखील वाचा :
GST Council Meet | ऑनलाइन गेमिंगवरील निर्णय रखडला, काय स्वस्त काय महाग; ‘ही’ आहे यादी
Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा
Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज