बहुजननामा ऑनलाईन – Mumbai Indians | आयपीएल 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. हा आयपीएलचा 16 वा सिझन आहे. हा सिझन सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला आयपीएलमधून बाहेर पडला आहे. हॅमस्ट्रिंग मधून सावरण्यासाठी त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच तो ऍशेस मालिकेलादेखील मुकण्याची शक्यता आहे. (Mumbai Indians)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागच्या आठवड्यात क्लब क्रिकेट खेळताना रिचर्डसनला पुन्हा दुखापत झाली. याअगोदर त्याला बीबीएलमध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला भारतातील एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले होते. तो यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार होता. त्याला मुबईच्या संघाने लिलावात दीड कोटींना विकत घेतले होते. तो मागच्या सिझनमध्ये पंजाब किंग्जच्या संघाकडून खेळला होता. यामुळे मुबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण मुंबईचा हुकमी एक्का वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील दुखापतीमुळे या सिझनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता मुंबई इंडियन्स या दोघांच्या जागी कोणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Mumbai Indians)
Injuries are a big part of cricket, thats a fact. Frustrating? Absolutely.
But I’m now in a scenario where I can get back to doing what I love and work bloody hard to become an even better player than before.
One step back, two steps forward.
Let’s do this. pic.twitter.com/7FdFeV8adj— Jhye Richardson (@jhyericho) March 11, 2023
रिचर्डसन मागच्या बऱ्याच काळापासून दुखापतीशी झुंज देत आहे. 2019 मध्ये खांद्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तो त्या वर्षीचा एकदिवसीय विश्वचषक आणि ऍशेसमधून बाहेर पडला होता.
यानंतर त्याने डिसेंबर 2021 मध्ये अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये पुनरागमान केले व 5
विकेटदेखील घेतल्या. यानंतर त्याच्या टाचेच्या दुखापतीने त्याला पुढील सामन्यातून बाहेर व्हावे लागले.
त्यानंतर अजूनपर्यंत त्याने संघात पुनरागनमन केले नाही. “आम्ही सर्वजण झायबद्दल समजू शकतो.
तो लवकर बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही त्याला तिथून परत आणू शकतो.
कारण त्याचे 12 महिने कठीण गेले आहेत.” असे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अॅडम व्होगेस म्हणाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Mumbai Indians | mumbai indians team has suffered a major shock as jhye-richardson has been rulled out from the ipl 2023
हे देखील वाचा :
Oscars 2023 | 62 वर्षांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होणार ‘हा’ मोठा बदल; सेलिब्रिटी मात्र नाराज