मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महापालिका निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे यात मात्र शंका नाही. गेल्या निवडणुकीत मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं होतं. या निर्णयाची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मालमत्ता कराअंतर्गत येणाऱ्या १० करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ केला जाणार आहे. इतर ९ कर मात्र भरावे लागणार आहे. मदत म्हणून काही दिले तर नाहीच, उलट सामान्य मुंबईकरांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरु, असा टोला आशिष शेलारांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला लगावला आहे.
मुंबई महापालिकेच्या 2020-21च्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती अत्यंत गंभीर.. 1 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंदाजित उत्पन्नाच्या केवळ 25% उत्पन्न जमा!
वा, रे वा सत्ताधारी..
श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणली
हीच का ती तुमची, करुन दाखवलेली कामगिरी!!
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2021
आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये असे म्हंटल आहे की, महापालिकेच्या तिजोरीची लूट करून सत्ताधीशांच्या धनदांडग्यावर सवलतीचा पाऊस केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या २०२०-२१च्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती अत्यंत गंभीर.. १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अंदाजित उत्पन्नाच्या केवळ २५% उत्पन्न जमा! वा, रे वा सत्ताधारी… श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणली. हीच का ती तुमची, करुन दाखवलेली कामगिरी!!
बिल्डरांना प्रीमियममध्ये ५०% सूट, कंत्राटदारांना सुरक्षा/ अनामत रक्कम, कामगिरी हमीत सूट, जाहिरातदारांना अनुज्ञापन शुल्कात ५०% सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात तिमाहीसाठी १००% सूट…ताजला सूट… सत्ताधीशांचा धनदांडग्यांवर सवलतीचा पाऊस अन् महापालिकेच्या तिजोरीची लूट! सामान्य मुंबईकरांना २०१५ ते २०२० पर्यंत मालमत्ता करातून वगळण्यात आले. मात्र आता सर्व ५०० चौ. फु.पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घर मालकांना मालमत्ता कराच्या दहापैकी नऊ कर हे थकबाकीसह भरावे लागणार! मदत म्हणून काही दिले तर नाहीच, उलट सामान्य मुंबईकरांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरु,” असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.