मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळत असतानाच आता राज्यासमोर नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये या आजाराने शिरकाव केला असून 7 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे.
राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या 2113 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 120 मृत्यू झाले आहेत. यापैकी केवळ 213 रुग्ण बरे झाले आहेत तर 120 रुग्णांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या राज्यात 1780 रुग्णांवर विविध जिल्ह्यांमध्ये उपचार सुरु आहेत. म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. मध्यंतरी पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.
म्युकरमायकोसिसचे पुण्यामध्ये 620 रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 29 रुग्ण बरे झाले आहेत. तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यामध्ये 564 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्या खालोखाल नागूपर, नांदेड, मुंबई, अहमदनगर यांचा क्रमांक लागतो. तर सांगली, औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे. पुण्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यानंतर नांदेड मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनासह म्युकरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी म्युकरमायकोसिसशी लढण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, यासंदर्भात राज्य सरकारने माहिती दिली.
औषधासाठी जागतिक निविदा
म्युकरमायकोसिस या आजारावर उपचारासाठी अॅम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरलं जातं. याची किंमत जास्त असल्याने केंद्र सरकारकडून या इंजेक्शनचे वाटप केले जाते. केंद्र सरकारकडून रुग्णांच्या संख्येनुसार जिल्ह्यांना या इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रात हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या 60 हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरुन थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार
महाराष्ट्र शासनाने या आजाराला नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्यभरात 131 रुग्णालयं नोटफाईड करण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे 2113 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर या योजनेंतर्गत उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.