नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्लॅक आणि व्हाईट फंगसनंतर आता यलो फंगसच्या एंट्रीने डॉक्टरांची चिंता वाढवली आहे. गाजियाबादमध्ये यलो फंगसचा एक रूग्ण सापडला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, 45 वर्षांच्या ज्या रूग्णात यलो फंगस सापडला आहे त्यास अगोदर कोरोना संसर्ग झाला होता आणि सध्या डायबिटीजने पीडित आहे. डॉक्टरांनुसार ब्लॅक फंगस रुग्णांचा उपचार करण्यासाठी ओटीमध्ये स्वच्छता सुरू होती, तेव्हा तपासणीत आढळले की, रूग्ण यलो फंगसने सुद्धा संक्रमित झाला आहे. मात्र, रुग्णाच्या स्थितीत सुधारणा आहे.
पहिल्यांदा मनुष्यात दिसला
गाजियाबादचे इएनटी स्पेशलिस्ट डॉ. बीपी त्यागी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एक रूग्ण आला होता. एंडोस्कोपी टेस्टमध्ये समजले की, त्याला ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगस आहे. यलो फंगस रेप्टाइल्स मध्ये आढळतो. पहिल्यांदा हा मनुष्यात आढळला आहे.
या आजारास म्यूकर स्पेक्टिक्स म्हणतात. हा इतका धोकादायक होऊ शकतो की रूग्णाचा जीव जाऊ शकतो. पाल आणि सरड्यामध्ये तो आढळतो. ज्या रेपटाईलला फंगस होतो तो जीवंत रहात नाही. म्हणून तो अतिशय धोकादायक समजला जातो.
यलो फंगसची लक्षणे
– नाक बंद होणे
– शरीरातील अवयव सुन्न होणे
– शरीर कसकसणे आणि वेदना
– शरीर अतिशय कमजोर होणे
– हार्ट रेट वाढणे
– शरीरात जखमांमधून पू वाहणे
– शरीर कुपोषित दिसू लागणे
या कारणांमुळे पसरतो यलो फंगस
अशाप्रकारे फंगस इन्फेक्शन स्वच्छता न ठेवणे, खराब आहार, स्टेरॉईड्सचा वापर, अँटीबॅक्टेरियल औषधांमुळे बाहेर पडतो. याशिवाय एखाद्या दुसर्या आजाराशी सामना करत असलेल्या रूग्णाची इम्यूनिटीक कमजोर झाल्याने सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकते.