वृत्तसंस्था – भारताला विश्वकप मिळवून देणारा धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामध्ये धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्त जाहीर केली असली तरी तो आयपीएलचे सामने खेळणार आहेत. धोनीच्या निवृत्तीमुळे त्याच्या चाहत्यांना अतिशय मोठा धक्का बसला आहे.
Indian cricketer Mahendra Singh Dhoni announces retirement from international cricket. pic.twitter.com/3UwE6ZXfK6
— ANI (@ANI) August 15, 2020
गेल्या अनेक दिवसांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक वेळा चर्चा होत होत्या. त्यांनं आगामी विश्वचषक स्पर्धा खेळावी अशी त्यांच्या चाहत्यांची तसेच काही निवृत्त क्रिकेटरची इच्छा होती. मात्र, आज स्वांतत्र्यदिनाच्या दिवशीच धोनीनं तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं सांगितलं आहे.