पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात करण्यात येते यामध्ये वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतच्या परीक्षा घेतल्या जातात. काल एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील हर्षल भामरे हे राज्यातून आणि मागासवर्गीयातून प्रथम आले, तर महिलांमध्ये कोल्हापुरातील पद्मश्री दाईंगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
या पदासाठी एक सयुंक्त पूर्व परीक्षा असते त्यांनतर मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यात परीक्षेचे स्वरूप असते . या पदासाठी आयोगाने लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण ४२८ पदांसाठी ही परीक्षा घेतली होती. मराठीच्या ३९२, तर इंग्रजीच्या ३६ पदांसाठी ही परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. अपंगांसाठी राखीव असलेल्या पदांसाठीच्या पात्र उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अटीवर शिफारस करण्यात आली आहे.