पटना वृत्तसंस्था बहुजननामा ऑनलाईन : मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चक्क एका आईने तिच्या सात महिन्यांच्या मुलाचा गळा दाबून जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरम्यान, तिची चार वर्षांची मुलगी तिच्या बाजूला उभी होती. हेही सांगितले जात आहे की, सासू आणि सुनेच्या नात्यात असंतोष होता.
ही घटना कन्नौजच्या छिबरामऊ येथील बिरतिया येथील आहे, जेथे रुखसार तिच्या सासू आणि मुलांबरोबर राहते. मुंबईत तिचे पती शाहिद मजुरी करतात. रुखसार यांच्या मुलाला तीन दिवस ताप होता. शनिवारी, जेव्हा ती मुलाला घेऊन डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा डॉक्टरांनी पहिली बाकी चुकवली नाही म्हणून औषध दिले नाही.
यानंतर घरी पोचल्यानंतर रुखसारने आपल्या मुलीसमोर ७ महिन्याच्या बाळाचा गळा दाबला यातच ते बाळ दगावले गेले. त्यानंतर, जेव्हा त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली तेव्हा रुखसारनेच स्वतःहून सर्व माहिती सांगितली. त्यावेळी ती मुलाजवळ बसली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी बाळाचा मृतदेह पोस्ट-मॉर्टमसाठी पाठविला आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की आईने आपल्या मुलाचा खून केला आहे. परंतु बाळ आजारी असल्याची गोष्टही समोर येत आहे. पोलिसांनी सांगितले की प्रत्येक पैलूची तपासणी केली जात आहे. पोस्ट-मॉर्टम अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले की, सासू आणि सुनामध्ये असलेल्या असंतोषांच्या कारणाबद्दलहि त्यांना प्रश्न विचारण्यात येईल.