बरेली वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने दलित तरुणाशी लग्न केल्याने भाजप आमदार श्याम प्रकाश यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून बरेली प्रकरणाला घेऊन काही पोस्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी साक्षीला पाठींबा देणाऱ्या लोकांवर आणि दलितांवर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट केल्या आहेत.
बरेलीचे आमदार राजेश मिश्रा यांच्या मुलीने एका दलित तरुणाशी लग्न केले. त्यानंतर माझा पती आणि माझ्या जीवाला माझ्या वडीलांकडून धोका आहे. असं म्हणत साक्षीने प्रशासनाकडे मदत मागितली होती. संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोघेही चर्चेत आले होते. अजितेश या दलित तरुणाशी लग्न केल्यानंतर वेगवेगळ्या स्तरांतून दोघांना पाठींबा देणाऱ्या आणि त्यांना विरोध करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर येत आहेत. त्यानंतर आता शाम प्रकाश यांनी यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
काय म्हणाले शाम प्रकाश ?
आमदाराच्या मुलीने दलिताशी लग्न केल्याप्रकरणात मिडिया, टिव्ही डिबेटमध्ये आमदाराची चूक आहे. असे म्हणत आहेत. त्यांची मुलगी, बहिण ज्या दिवशी एखाद्या ……सोबत पळून जाऊन लग्न करेल त्या दिवशी त्या बापाला समाजातील अपमानाला सामोरं गेल्यानंतर याची जाणीव होईल.