पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Moosewala Murder Case | पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Moosewala) हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण (Pune Rural) कनेक्शन (Connection) समोर आले आहे. अखेर मूसेवाला हत्या प्रकरणात सौरभ महाकाल (Saurabh Mahakal) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) अटक केली आहे. या प्रकरणात (Moosewala Murder Case) एकूण आठ आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी सौरभ महाकाल आणि संतोष जाधव (Santosh Jadhav) या दोघांची नावे समोर आली.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ उर्फ महाकाळ याला संगमनेर जवळ अटक (Arrest) करण्यात आली आहे. सिद्धेश कांबळे याच्यावर याआधी मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली होती. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केल्यावर 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फारर झाले होते. हे दोघेही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधीले (Lawrence Bishnoi Gang) असल्याचे समोर आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती. संतोष जाधव हाच आरोपी असू शकतो, यावरुन आज पंजाब पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना विचारणा केली.
गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला (Moosewala Murder Case) करण्याकरता सचिन बिश्णोई गँगने (Sachin Bishnoi Gang) महाराष्ट्रातून दोन शार्प शूटर (Sharp Shooter) बोलावले होते. संतोष जाधव व महाकाल नावाचे हे दोन शूटर होते. ज्यांनी मुसेवालावर गोळीबार (Firing) केला. यांची नावे पंजाब पोलिसांनी (Punjab Police) जाहीर केली. मुसेवालची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते.
3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि एक राजस्थानमधील होता.
Web Title :- Moosewala Murder Case | pune rural police arrested saurabh mahakal in punjabi singer sidhu moosewala murder case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update