Money Laundering Case | महाराष्ट्रातील बड्या IPS अधिकाऱ्याला ED चे समन्स, माजी गृहमंत्र्यांशी लागेबांधे?
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Money Laundering Case |100 कोटींच्या वसूली प्रकरणात (Money Laundering Case) सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) चौकशी सुरु आहे. आज (बुधवार) सचिन वाझे (sachin vaze) याची उर्वरित चौकशी पार पडणार आहे. यासोबतच देशमुख हे देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परंतु देशमुख यांच्याशी निगडीत मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) आता अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांना (Akola SP) समन्स (Summons) पाठवण्यात आले आहे.
अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (IPS Officer G Shreedhar) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स जारी केला आहे. त्यानुसार त्यांना येत्या 17 डिसेंबरला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. यासाठी ते उपस्थित देखील राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार अनिल देशमुख यांच्यासंबंधी मनी लॉड्रिंगचं प्रकरण (Money Laundering Case) सुरु आहे.
खंडणी प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. या संपूर्ण चौकशीत जी. श्रीधर यांचं नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यामुळे ईडीच्या चौकशीनंतर या प्रकरणात जी श्रीधर (IPS Officer G Shreedhar) यांचा असलेला सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणीचे (ransom) आरोप केले.
यानंतर वाझेशी असणारे संबंध उघडकीस आल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.
त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा सुरुच आहे.
या कथित घोटाळ्यासंदर्भात चांदीवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली.
त्यानुसार वाझे आणि देशमुख यांची चौकशी सुरु आहे.
त्यातच आता अकोल्याचे पोलीस अधीक्षकांनाही चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.
Web Title :- Money Laundering Case | akola sp IPS Officer G Shreedhar summoned by ed in anil deshmukh money laundering case.
Farmers Unique ID | शेतकर्यांना मिळेल यूनिक ID, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे होईल सोपे
OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के, आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक
Udayanraje Bhonsle | भाजप खा. उदयनराजे यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
PM JanDhan Yojana | जनधन खातेधारकांना मोफत मिळतील 10,000 रुपये, तुम्ही सुद्धा तात्काळ उघडा आपले खाते
Comments are closed.