बहुजननामा ऑनलाईन – ग्लोबल एजूटेनमेंट थीम पार्क किडजेनिया आणि टर्किश एअरलाईनस यांनी मिळून आज एक करार केला. याअंतर्गत आता दिल्ली एनसीआर येथील विद्यार्थ्यांना नोएडामधील KidZania सेंटरमध्ये विमान उडवण्यापासून ते त्या संदर्भातील अनेक कामे शिकायला मिळणार आहे. या कोर्ससाठी विद्यार्थ्यांना वेगळी फी देण्याची अवशक्यता नाही. KidZania ची एन्ट्री फी फक्त या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. या एन्ट्री फी अंतर्गत विद्यार्थ्यांना फक्त ६५० रुपये देण्याची आवश्यकता आहे.
कोण घेऊ शकतो प्रवेश
KidZania हे एक थीम पार्क आहे. जिथे ४ ते १६ वर्षाची मुले प्रवेश घेऊ शकतात. किडजेनिया सेंटर मध्ये मुले प्रत्येक गोष्टीबद्दल प्रात्यक्षिक माहिती घेऊ शकतात. यामध्ये मुलांना विमान उडवण्यापासून ते कार, थियेटर, हॉस्पिटलायजेशन सोबतच अनेक गोष्टींमधील बेसिक ज्ञान दिले जाते. जे भविष्यात मुलांना उपयोगी येऊ शकते. या किडजेनिया सेंटर मध्ये एकट्याने किंवा समूहाने प्रवेश घेऊ शकतो. किडजेनियाचे जगात २७ केंद्र आहेत. यामधील दोन केंद्र हे भारतात आहेत. एक केंद्र नोएडा आणि एक केंद्र मुंबई येथे आहे.