बहुजननामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशॅलिस्ट केडर ऑफिसर (एससीओ) च्या ७६ जागांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत जॉब पोर्टल https://bank.sbi/careers वर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०१९ आहे. बँकिंग क्षेत्रात करिअरची अपेक्षा असलेले इच्छुक उमेदवार या पदासाठी १२ ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात.
एकूण पदांची संख्या : ७७
पोस्टचे नाव आणि माहिती
१) उपमहाव्यवस्थापक (भांडवल नियोजन) – ०१ पोस्ट
२) एसएमई क्रेडिट एनालिस्ट – ११ पदे एसएमई क्रेडिट एनालिस्ट (स्ट्रक्चरिंग) – ४ पदे
३) एसएमई क्रेडिट एनालिस्ट – १० पदे
४) क्रेडिट एनालिस्ट – ५० पदे
५) उपमहाव्यवस्थापक – ०१ पद
वयोमर्यादा:
१) डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅपिटल प्लॅनिंग, अॅसेट लायबिलिटी मॅनेजमेंट) – ४५ वर्षे
२) एसएमई क्रेडिट एनालिस्ट (सेक्टर स्पेशलिस्ट, स्ट्रक्चरिंग), एसएमई क्रेडिट एनालिस्ट, क्रेडिट एनालिस्ट – ३५
शैक्षणिक पात्रताः
१) उपमहाव्यवस्थापक (भांडवल नियोजन), या पदासाठी उमेदवार पदवी, सीए, एमबीए किंवा वित्तमध्ये पीजीडीएम असायला हवा.
२) एसएमई क्रेडिट विश्लेषक पदासाठी उमेदवार बीई / बीटेक आणि एमबीए असावा.
३) उपमहाव्यवस्थापक पदासाठी एमबीए (वित्त) आणि सीए पास असावा.
येथे अर्ज करा :
अर्ज करण्यासाठी एसबीआयच्या अधिकृत जॉब पोर्टल https://bank.sbi/careers वर भेट द्या. जर आपला अर्ज स्वीकारला असेल तर आपल्याला मुलाखतीसाठी ईमेलद्वारे ईमेल पाठवला जाईल.