MNS Vasant More | वसंत मोरे यांनी प्रभाग क्र. 56, 57, 58 मधून मनसेचे 5 नगरसेवक निवडूण आणण्याचा विडा उचलला; पक्षांतर्गत ‘विरोधक’ ‘तात्यां’ प्रमाणे चॅलेंज स्वीकारणार ?
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – MNS Vasant More | कट्टर समर्थकाने पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याची नाराजी दूर करत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या हस्ते त्या समर्थकाची पुन्हा पुर्वीच्याच पदावर नेमणूक करणारे मनसेचे वसंत मोरे (MNS Vasant More) हे आगामी निवडणुकीत (Pune PMC Election 2022) मनसेतच राहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एवढेच नव्हे पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांशी ‘संवाद’ हरपल्यानंतर मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे तीन प्रभागातील पॅनेल लढविणार असल्यावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘नाराजीनाट्याच्या’ अनेक प्रयोगानंतरही मोरे यांनी तीन प्रभागातील पॅनेलमधून पाच नगरसेवक निवडूण आणण्याचा ‘विडा’ उचलल्याने मनसेच्या शहरातील पदाधिकार्यांना एकप्रकारेे ‘आव्हान’ दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या भुमिकेविरोधात सूर आळवणारे मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक वसंत मोरे यांची तातडीने शहर अध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली. यानंतर मनसेच्या पदाधिकार्यांनी मोरे यांना बाजूलाच केल्यानंतर ‘नाराजी नाट्याचे’ अनेक अंक झाले. मोरे यांनी स्वत: दोनवेळा राज ठाकरे यांची भेट घेतली. मोरे यांना बाजूला केल्यानंतर ठाकरे यांच्या भुमिकेवरून त्यांनी नेमलेल्या काही मुस्लिम पदाधिकार्यांनीही राजीनामे दिले.
मोरे यांना पक्षाच्या पदाधिकार्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर नाराज होत मनसे माथाडी सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझीरे यांनी पदाचा व पक्षाचा राजीनामा दिला होता.
दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांच्या अनौपचारीक भेटींमुळे मोरे आणि माझीरे हे शिवसेनेत जाणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली. (MNS Vasant More)
मात्र दोनच दिवसांपुर्वी मोरे यांनी माझीरे यांची नाराजी दूर करत त्यांच्यासोबत राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी स्वत: माझीरे यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केल्यानंतर मोरे आणि माझीरे हे मनसेतच राहाणार हे स्पष्ट झाले. याचवेळी ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान मोरे यांनी पदाधिकार्यांबरोबर वाद टाळण्यासाठी प्रभाग क्र. 56 चैतन्यनगर- भारती विद्यापीठ, प्रभाग क्र. 57 सुखसागर नगर – राजीव गांधीनगर आणि प्रभाग क्र. 58 कात्रज – गोकुळनगर या तीन प्रभागातील 9 जागांची जबाबदारी घेतली. मागील 15 वर्षाच्या कारकिर्दीत या तिनही प्रभागातून मोरे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे.
या तीन प्रभागामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधीक 8 नगरसेवक असून खालोखाल भाजपच्या तीन नगरसेविका आहेत. नवीन प्रभाग रचनेमधील वरिल तीन्ही प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4 नगरसेवक आणि भाजपची एक नगरसेविका आणि स्वत: वसंत मोरे हेच निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या तीनच प्रभागात अधिकाअधिक लक्ष केंद्रीत करून मनसेचे 5 उमेदवार निवडूण आणेन असा दावा मोरे यांनी केला आहे. मी केवळ याच तीन प्रभागांवर फोकस करेन अन्य प्रभागात लक्ष घालणार नाही, असा शब्दही त्यांनी ठाकरे यांना दिला असून त्याला ‘ग्रीन सिग्नल’ ही देण्यात आल्याची माहिती आहे.
मोरे यांनी ही जबाबदारी घेत ठाकरे यांच्यावरील श्रद्धेची चुणूक दाखविली आहे. परंतू यामुळे आपोआपच पक्षांतर्गत विरोधकांनाही एकप्रकारे ‘चॅलेंज’ केले आहे. मोरे यांच्या विरोधात आघाडी उघडणार्या पदाधिकार्यांनाही मोरे यांच्याप्रमाणेच ‘जबाबदारी’ घ्यावी लागणार आहे.
केवळ ‘मम’ म्हणून अस्तित्व दाखविण्याऐवजी ‘कर्तृत्व’ दाखविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असे दिसते.
Web Title :- MNS Vasant More | Vasant More Prabhag Ward no 56 57 58 MNS 5 Corporators took the initiative to get elected Will the opposition within the party accept the challenge like Tatya
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Deepali Sayed On BJP | ‘एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही’; दिपाली सय्यद यांचा टोला
- Pooja Chavan Suicide Case | ‘पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चीट द्या’, बंजारा महंतांची पुणे पोलिसांकडे मागणी
- MP Sujay Vikhe-Patil | “शिवसेनेचा गेम राष्ट्रवादीनेच केला; मुख्यमंत्र्यांनी षडयंत्र ओळखावं” – खासदार सुजय विखे-पाटील
Comments are closed.