Corona Fourth Wave | ज्याची सर्वांना भीती होती तेच घडलंय, ‘कोरोना’ची चौथी लाट सुरु – WHO
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Corona Fourth Wave | मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची (Corona in Maharashtra) संख्या वाढत आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona in Maharashtra) असल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या वेगाने वाढत आहे. दैनंदिन रुग्ण संख्या वाढत असताना जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याची सर्वांना भीती होती तेच घडलंय. कोरोनाची चौथी लट सुरु (Corona Fourth Wave) झाल्याचं WHO नं म्हटलंय. कोरोनाच्या नव्या छोट्या लाटेला सुरुवात झाल्याचा जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे.
ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट (Omicron Sub Variant) वेगानं पसरतोय, असेही WHO नं नमूद केलं आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात BA.4 आणि BA.5 व्हेरियंट वेगानं पसरतोय, असा इशारा WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी दिलाय. हीच चौथ्या लाटेची सुरुवात आहे. दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या लहान लाटा येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Corona Fourth Wave)
दरम्यान, राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत (Mumbai) होत आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा 13 हजार पार गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह अधिकारी वर्ग आणि प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर राज्य सरकार (State Government) लवकरच काही निर्बंध (Restriction) लागू करु शकते.
राज्यातील दैनंदिन आकडेवारी
1 जून – 1081
2 जून – 1045
3 जून- 1134
4 जून – 1357
5 जून – 1494
6 जून – 1036
7 जून – 1881
8 जून – 2701
9 जून – 2813
10 जून – 3081
Web Title :- Corona Fourth Wave | World Health Organization who world health organization chief scientist soumya swaminathan on covid fourth wave
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- MNS Vasant More | वसंत मोरे यांनी प्रभाग क्र. 56, 57, 58 मधून मनसेचे 5 नगरसेवक निवडूण आणण्याचा विडा उचलला; पक्षांतर्गत ‘विरोधक’ ‘तात्यां’ प्रमाणे चॅलेंज स्वीकारणार ?
- Deepali Sayed On BJP | ‘एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही’; दिपाली सय्यद यांचा टोला
- Pooja Chavan Suicide Case | ‘पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चीट द्या’, बंजारा महंतांची पुणे पोलिसांकडे मागणी
Comments are closed.