बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार(MLA Rohit Pawar) हे अनेकदा सकाळी सकाळी एखाद्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात. पुण्यातील मेट्रोची पाहणी त्यांनी अशीच पहाटे केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आज पुतणे आमदार रोहित पवार हे एपीएमसीमधील भाजी व फळ मार्केटमध्ये पहाटे ४ वाजता पोहचले.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी एपीएमसीमधील व्यापारी तसेच काही शेतकर्यांशी संवाद साधत चर्चा केली. एपीएमसीमधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि व्यापार्यांना एपीएमसीमध्ये येणार्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडण्यासाठी व त्यांचे कामकाज जाणून घेण्यासाठी आज भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांच्या भेटीमुळे महापालिका निवडणुकांमध्ये ते सक्रीय होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.