कुडाळ : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचे आमदार यांच्यावर वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्यावर सध्या राज्य लाचलुचपत विभागाची (Anti Corruption Bureau) कारवाई सुरु आहे. त्यांच्या समर्थनार्थ आज कुडाळ तालुक्यात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर (BJP) टीका केली. यावेळी भास्कर जाधवांनी (MLA Bhaskar Jadhav )अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या हत्येमागे संजय राठोड (Sanjay Rathod) आहेत, असे सातत्याने भाजपकडून रान उठविले गेले. त्यावेळी रोज सकाळी चित्रा वाघ (Chitra Wagh) टिव्हीवर येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे न्यायाची मागणी करायच्या. आज त्या चित्रा वाघ कुठे आहेत, असा प्रश्न भास्कर जाधवांनी उपस्थित केला. तसेच आज पूजा चव्हाणच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, कारण चित्रा वाघ यांच्या पक्षाच्या सरकारमध्ये संजय राठोड यांना सन्मानाने मंत्रिमंडळात घेतले आहे, असे देखील भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) म्हणाले.
आज राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (NCP Anil Deshmukh) तुरुंगात आहेत. नवाब मलिक (Nawab Malik)
तुरुंगात आहेत. मलिकांवर आरोप केला की, त्यांचा मुंबई बॉम्बस्फोटात (1993 Mumbai Serial Bomb Blast)
सहभाग होता. पण ज्यावेळी फडणवीसांचे (Devendra Fadnavis) पाच वर्षे सरकार होते, तेव्हा त्यांना मलिक बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून वाटले नाहीत. आज ते आम्हाला म्हणतात, तुम्ही बॉम्बस्फोटातील आरोपिंच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. पण ज्यावेळी 2019 साली भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांना तसे नाही वाटले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला असता, आणि अजित पवार पुन्हा आले नसते, तर हेच लोक नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसले असते, असे भास्कर जाधव म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MLA Bhaskar Jadhav | shivsena uddhav thackeray group bhaskar jadhav targets bjp
हे देखील वाचा :
Pune Crime | विमानतळ परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाला लुटले
Ajit Pawar | राजन विचारेंच्या जीवाला धोका, पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रावर अजित पवार म्हणाले…
Rohit Pawar | पवार कुटुंबात देखील फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव, आ. रोहीत पवारांचा मोठा दावा