पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दुकानातील ताडपत्री चोरत आहात का? असा जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी दूकानमालकाला रॉडने मारहाण (Beating) करीत जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. ही घटना (Pune Crime) रविवारी (दि.16) रात्री मंगळवार पेठेतील कोंबडी पुलावर घडली.
आरीफ शेख, आकाश रजपूत (दोघे. रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अमीर फारूख शेख (वय-23, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अमीर हे मंगळवार पेठेतील कोंबडी पूलावर ताडपत्री विकण्याचा व्यवसाय करतात.
आरोपी आरीफ आणि आकाश रजपूत हे दोघे अमीरच्या दुकानाजवळ उभे होते.
त्यावेळी आरोपी ताडपत्री चोरून नेत असल्याची माहिती अमीरला दूकानाशेजारील एकाने दिली.
तुम्ही माझ्या दुकानातील ताडपत्री चोरत आहात का? असे आरोपींना विचारले.
याचा राग आल्याने आरीफ आणि आकाश यांनी अमीर यांना मारहाण केली. लोखंडी रॉडने अमीरला मारहाण करीत जखमी केले. आरीफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग (API Manoj Abhang) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Beating with a rod out of anger for being asked to answer for stealing tarpaulin, the incident at Kombadi Bridge
हे देखील वाचा :
Pune Crime | विमानतळ परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाला लुटले
T20 World Cup 2022 | टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्याने सांगितले कारण