MLA Anil Parab | आमदार अनिल परबांसह 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल; चौघे अटकेत

MLA Anil Parab | Crime Registered Against MLA Anil Parab BMC Employee Case Vakola Police

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – MLA Anil Parab | महानगरपालिका कर्मचारी मारहाण प्रकरणी (Mumbai Municipal Corporation) ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब (MLA Anil Parab) यांच्यासह जवळपास 20 ते 25 जणांविरुध्द गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील (BMC Assistant Engineer Patil) यांना सोमवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. याप्रकरणी मुंबईच्या वाकोला पोलिसांनी (Wakola Police) गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत चार जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. तर इतर फरार असलेल्या आरोपींचा वाकोला पोलीस शोध घेत आहेत. मुंबई महापालिका कर्मचाऱ्याच्या (BMC Employees) तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब (Sada Parab), माजी नगरसेवक हाजी हलीम खान (Haji Halim Khan), शाखाप्रमुख संतोष कदम (Santosh Kadam), शाखाप्रमुख उदय दळवी (Uday Dalvi) यांना अटक केली.

दरम्यान, सध्या वाकोला पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या मारहाणीनंतर वाकोला पोलिसांनी 13 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) तपासून काहींना सोडून देण्यात आले आहे.

Web Title : MLA Anil Parab | Crime Registered Against MLA Anil Parab BMC Employee Case Vakola Police